
Kunbi Protest
esakal
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे हे आरक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत ५८ लाख मराठी कुणबी नोंदी सापडल्या असून, त्यामुळे ५८ लाख मराठे ओबीसीत समाविष्ट होणार आहेत. मात्र, मूळ ओबीसी समाजातून या निर्णयाला विरोध होत आहे. सध्या ओबीसी प्रवर्गात आधीच ३५० हून अधिक जातींचा समावेश आहे. त्यामुळे भविष्यात सर्वच स्तरांवर स्पर्धा वाढेल, अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ओबीसी प्रवर्गातील मूळ कुणबी समाजानेही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.