

Demand Grows for Bhayandar to Virar West Metro Expansion
esakal
विरार: वसई–विरार महानगर क्षेत्रासाठी प्रस्तावित असलेल्या मेट्रो प्रकल्पातील मार्गिका ही एकतर्फी व सदोष नियोजनावर आधारित असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रवीण बेबीबाई रघुनाथ पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) चे आयुक्त संजय मुखर्जी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.