दुकानात चॉकलेट घेण्याकरिता आलेल्या मुलीसोबत केले अश्लील चाळे

दुकानात चॉकलेट घेण्याकरिता आलेल्या मुलीसोबत केले अश्लील चाळे

उल्हासनगर : दुकानात चॉकलेट घेण्याकरिता आलेल्या अल्पवयीन (वय 12) मुलीसोबत अश्‍लील चाळे करून तिच्याशी लगट करणाऱ्या दुकानदाराला उल्हासनगर पोलिसांनी विनयभंग व पोक्‍सोअंतर्गत अटक केली आहे. 

या दुकानदाराचे नाव भरत तोलानी (50) असे असून आहे. तोलानी याचे उल्हासनगर येथे रंगीला जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एक 12 वर्षीय मुलगी चॉकलेट घेण्यासाठी दुकानात गेली असता दुकानाच्या आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून तोलानी याने तिच्याशी अश्‍लील वर्तन करत तिचा विनयभंग केला.

घडलेली सर्व घटना मुलीने घरी सांगितल्यावर तिच्या कुटुंबियांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तोलानी याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बांबळे करत आहेत. 
 

web title : Obscene tricks with a girl who came to shop for chocolate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com