मुंबईत जगभरातील दीड हजार नर्तक एकत्र येणार...

मुंबईत जगभरातील दीड हजार नर्तक एकत्र येणार...

मुंबई - भारतीय शास्त्रीय संगीताला आचार्य पार्वतीकुमार यांनी जगभरात पोहोचवले. तसेच ही भारतीय परंपरा, संस्कृती टिकवून ठेवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. लवकरच आचार्य पार्वतीकुमार यांची जन्मशताब्दी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त 27 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान नेहरू सेंटर, रवींद्र नाट्यमंदिर, भरत कॉलेज सेंटर येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जगभरातील दीड हजारहून अधिक कलाकार शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. 

महोत्सवात शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय वाद्य, शास्त्रीय संगीत यांसारख्या एकूण नऊ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऋतुचक्र आणि चित्रसूत्र हे दोन कार्यक्रम महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहेत. ऋतुचक्र हा कार्यक्रम महाकवी कालिदासांच्या काव्यांवर आधारित असणार आहे; तर चित्रसूत्र कार्यक्रमात प्रथमच शास्त्रीय नृत्याबरोबर कला, नाट्य, चित्रकला यांचा एकत्रित आविष्कार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

आचार्य पार्वतीकुमार यांच्या शिष्या आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या, शिवाय सरफोजीराजे भोसले सेंटरच्या संचालिका गुरू डॉ. संध्या पुरेचा यांनी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात डॉ. संध्या पुरेचा, पद्मश्री पुरू दधीच, गुरू विभा दधीच यांचा नृत्याविष्कार, दामिनी नाईक हिचे अरंगेत्रम्‌ या कलाप्रकाराचे सादरीकरण केले जाणार आहे. बालनृत्यांगना, किणकीणी या कलाविष्कारामध्ये युवा नृत्यांगनांचा समावेश असणार आहे.

on the occasion of parvatikumar janashatabdi thousands of classical dancers will perform

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com