उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षावर हाय व्होल्टेज मिटिंग, मुद्दे आहेत...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 February 2020

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यात अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीआधी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यातही बैठक झाल्याची चर्चा आहे.

येत्या २४ तारखेपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर आजची पार पडलेली बैठक महत्वाची मनाली जातेय. तब्ब्ल एक तास ही हाय व्होल्टेज बैठक सुरु होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या PM भेटीनंतर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय.  

मोठी बातमी - सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली असावी : 

  • परवा पासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत या बैठकीत चर्चा.
  • उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची काल भेट घेतलीये, या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा 
  • CAA, NRC आणि NPR बद्दल उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवरही या तीन पक्षांमध्ये चर्चा 
  • राज्यमंत्र्यांच्या नाराजीवर काही तोडगा काढता येईल का ? या संदर्भात चर्चा 
  • सावरकरांना भारतरत्न मिळण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. 
  • एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगावच्या चौकशीवरही या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
  • तिन्ही पक्षांच्या समन्वयाबद्दलही सध्या मद्यमांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत , याबाबतची चर्चा 

मोठी बातमी -  दोन महिन्यांपूर्वीच त्या कुटुंबानं सगळं संपवलं होतं, घरमालक भाडं घ्यायला आले तेंव्हा सगळं समजलं...

cm uddhav thackeray and sharad pawar meeting in varasha before state budget session

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray and sharad pawar meeting in varasha before state budget session