उल्हासनगरचे तत्कालीन आयुक्त निंबाळकरांवरील एक्ट्रॉसिटीचा गुन्हा रद्द

nimbalkar
nimbalkar

उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना करावा लागला असे स्पष्ट करताना त्यामुळे शहरविकासाचे बघितलेले स्वप्न अपूर्ण राहिल्याची प्रतिक्रिया निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

"उल्हासनगर महानगरपालिकाचा महारवाडा करायचा नाही. ,'' असे जातीवाचक व्यक्तव्य पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी उच्चारल्याचा आरोप रिपाइं आठवले गटाचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी केला होता. पोलीसांनी एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत नसल्याने भालेराव यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने नोव्हेंबर 2017 मध्ये निंबाळकर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्यवर्ती पोलिसांना दिले होते. पोलिसांनी एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याने निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची आज न्या.रंजित मोरे, न्या.भारती डांबरे यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली असता खंडपीठाने निंबाळकर यांच्या वरील एक्ट्रॉसिटीचा गुन्हा डिसमिस केला आहे.

उल्हासनगर महानगरपालिकाची स्थापना 1996 साली झाली. पालिकेच्या 22 वर्षाच्या इतिहासात तब्बल 40 आयुक्तांनी पदभार हाताळला आहे. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे, बालाजी खतगावकर या दोघांनीच तीन वर्षाच्या वर कालावधी हाताळला आहे. मात्र रोखठोक हजरजबाबी असा ठसा केवळ राजेंद्र निंबाळकर यांनीच उमटवला आहे. मासमिडियावर कमालीचे सक्रिय राहणारे राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीवरील किंबहूना पालिकेच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करणारी पोस्ट कुणी टाकली तर मासमिडियावर झटपट उत्तर देण्यात निंबाळकर तरबेज होते. विशेष म्हणजे शहरविकासाच्या तृट्या बाबत एखादी पोस्ट आली तर त्यावर तात्काळ निर्णय घेऊन सकारात्मक रिझल्ट देखील निंबाळकर देत होते. त्यांची आणखीन एक विशेषता म्हणजे त्यांनी सर्व पालिकेतील अधिकारी, सहाय्यक आयुक्त, संपुर्ण विभाग सिसिटीव्ही कॅमेरात वलयांकित केला होता. त्यांच्या दालनात सीसीटीव्हीचे लाईव्ह ते बघत होते. त्यामुळे थट्टामस्करी आदी प्रकारांवर त्यांनी जरब बसवली होती.
राजेंद्र निंबाळकर यांच्या कामाची शैली ही आक्रमक तेवढीच संयमी होती.

उल्हासनगर पालिकेला दहा वर्षांनंतर आयएएस अधिकारी निंबाळकर यांच्या रूपात मिळाल्यावर त्यांनी प्रथम शहरातील अस्वच्छता घाणीचे साम्राज्य हद्दपार केले. त्यांच्या पूर्वी आयुक्तांच्या दालनात लोकप्रतिनिधी उठसूट जात होते. निंबाळकर यांनी हा उठसूटचा प्रकार थांबवला होता. तुमच्या पॅनल मध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे मालमत्ता कराची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी पुढाकार घ्या, अन्यथा तुम्हाला नगरसेवक निधी विकासकामांना मिळणार नाही असा पवित्रा देखील निंबाळकर यांनी घेतल्याने त्यांनी नगरसेवकांचा रोष ओढून घेतला होता. अशात निनावी पत्राद्वारे त्यांचे वैयक्तिक चरित्रहनन करण्यात आले. निंबाळकर यांनी ही खंत महासभेत व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्यावर एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निंबाळकर यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत होते. अशातच त्यांची पुणे महानगरपालिकात अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली. पण तरीही ते मासमिडियावर उल्हासनगरच्या घडामोडी वाचत होते. पुण्यात राहताना ते एक्ट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील तारखांना उच्च न्यायालयात हजर राहत होते. शुक्रवारी त्यांच्यावरील एक्ट्रॉसिटीचा गुन्हा रद्द झाल्यावर त्यांनी हा आनंद मासमीडियावर शेअर केला.

''दूरदृष्टी ठेऊन विकासकामांचा अभ्यास करून त्यास मार्गी लावण्याचे स्वप्न बघितले होते. या शहराचा चांगला वाईट अनुभव आला. त्यातून खुपकाही शिकण्यास मिळाले.'' अशी प्रतिक्रिया राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com