कॉक्‍स ऍण्ड किग्सच्या संचालकांविरोधात गुन्हा; 174 कोटींच्या फसवणुकीचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉक्‍स ऍण्ड किग्सच्या संचालकांविरोधात गुन्हा; 174 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

खासगी बॅंकेच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने कॉक्‍स ऍण्ड किंग्सच्या संचालक व प्रमोटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे 174 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे.

कॉक्‍स ऍण्ड किग्सच्या संचालकांविरोधात गुन्हा; 174 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

मुंबई : खासगी बॅंकेच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने कॉक्‍स ऍण्ड किंग्सच्या संचालक व प्रमोटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे 174 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
 

हेही वाचा : बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेताना, पोलिसाकडून तरुणीशी संतापजनक वर्तन; त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या


ऑगस्ट 2019 मध्ये कोटक महिंद्रा बॅंकेने या प्रकरणी कंपनीविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला होता. या प्रकरणी सर्व पडताळणी केल्यानंतर गुरुवारी (ता.1) आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. 2012 मध्ये कंपनीच्या विनंतीनंतर बॅंकेने कॉक्‍स ऍण्ड किंग्स कंपनीला आर्थिक सवलती दिल्या होत्या. त्यांचा लाभ घेतल्यानंतर सुमारे 174.3 कोटी रुपये थकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी पुढील तपास करत आहे. 

हेही वाचा : एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने शिळफाटा येथे लाखो लिटर पाणी रस्त्यावर

फसवणूक, बनावटीकरण व विश्‍वासघात केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बॅंकेच्या वतीने न्यायवैद्यकीय लेखापरीक्षण करण्यात आले होते. त्यात बनावटीकरण करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
- राज्यवर्धन सिन्हा, सहपोलिस आयुक्त

--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

Web Title: Offenses Against Directors Cox Kings 174 Crore Fraud Charges

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top