'मेहनतीतून कमावलेलं माझं ऑफिस BMC तोडणार'; ऑफिसमध्ये जबरदस्ती अधिकारी घुसल्याचा कंगनाचा आरोप

तुषार सोनवणे
Monday, 7 September 2020

कंगनाने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये बीएमसीच्या अधिकारी माझ्या ऑफिसमध्ये जबरदस्ती आले आणि त्यांनी ऑफिस तोडण्याच्या तयारीत आहेत 

मुंबई - कंगना रानौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या ट्वीटवॉर वेगळ्याच दिशेन पुढे सरकत आहे. कंगनाने आपल्या नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये बीएमसीच्या अधिकारी माझ्या ऑफिसमध्ये जबरदस्ती आले आणि त्यांनी ऑफिस तोडण्याच्या तयारीत आहेत.

कंगनाविरोधात तक्रार दाखल; मनपाचे अधिकारी कंगानाच्या कार्यालयात दाखल

या ट्वीटमध्ये कंगना म्हणते की, हे मुंबईमधील मणिकर्णिका चित्रपटाचे कार्यालय आहे, ज्याला मी 15 वर्षांच्या मेहनती नंतर कमावले आहे. माझ्या आयुष्यात माझं स्वप्न होतं की, जेव्हा मी चित्रपट निर्माता होईल तेव्हा माझं स्वतःचं ऑफिस असेल, परंतु असं वाटतंय आता हे स्वप्न भंग होण्याची वेळ आली आहे. आज इथे अचानक बीएमसीचे काही लोक आले आहेत.

कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्या ऑफिसमध्ये काही लोक तपासणी करीत आहेत. ते लोक बीएमसीचे अधिकारी असल्याची तीने म्हटले आहे. त्यात ते लोक जबरजस्ती माझ्या ऑफिसमध्ये गेले असून अनेक गोष्टींचे माप घेत आहेत. त्यांनी माझ्या शेजाऱ्यांनाही त्रास दिला आहे. त्यांनी विचारणा केल्यावर, ते अधिकारी म्हटले की, वो जो मॅडम है उसकी करतूत का परिणाम सबको भरना होगा. मला उद्या सूचना देतील की ते माझी प्रॉपर्टी तोडत आहे.

आणखी एका ट्वीट मध्ये कंगना म्हटली की, बीएमसीने बेकायदेशीररित्या बांधकामाबाबत आधी स्ट्रक्चर प्लान पाठवायला हवा.आज त्यांनी माझ्या ऑफिसवर छापा मारला आणि बीना कोणत्याही नोटिसचे उद्या ते संपुर्ण स्ट्रक्चर तोडणार आहेत

दरम्यान, कंगना रनौत ची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तीला गृह मंत्रालयाकडून वाय सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. कंगनाने मुंबईपोलिसांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर. तसेच मुंबईची पीओके सोबत केलेली तुलना, ड्रग्स माफियांबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.त्यामुळे 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, तीने केलेल्या पीओके च्या विधानामुळे तीला राज्यात किंवा मुंबईत राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे म्हटले होते. 

---------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: office will break by BMC; Kangana accused of forcibly entering the officer