esakal | नाथाभाऊंना भाजपकडून शुभेच्छा ! राजीनामा मिळाल्यानंतर भाजपाची अधिकृत प्रतिक्रिया वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

नाथाभाऊंना भाजपकडून शुभेच्छा ! राजीनामा मिळाल्यानंतर भाजपाची अधिकृत प्रतिक्रिया वाचा

दरम्यान एकनाथ खडसे यांचा निर्णय चिंताजनक असल्याचं मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

नाथाभाऊंना भाजपकडून शुभेच्छा ! राजीनामा मिळाल्यानंतर भाजपाची अधिकृत प्रतिक्रिया वाचा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्रात आणखीन एक मोठा राजकीय भूकंप झालाय. भारतीय जनता पक्षाची सुरवातीपासून मोट बांधणारे, गेली चाळीस वर्ष भाजपाला मोठं करणारे भाजपातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणजेच नाथाभाऊ यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळाला आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांचा निर्णय चिंताजनक असल्याचं मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षासाठी हा चिंतनाचा विषय असल्याचंही मत सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.    

नाथाभाऊंचा राजीनामा मिळाल्यानंतर भाजपकडून प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेतली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडसेंचा  राजीनामा मिळाला आहे. एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत अशी आम्हाला आशा होती. एकनाथ खडसे आमचे नेते होते, त्यांच्यासोबत कायम संवाद सुरु होता. आमची इच्छा होती की त्यांनी भाजपात राहावं आणि आमचं नेतृत्व करावं. अगदी सकाळपर्यंत त्यांच्याशी चर्चा सुरु होती. मात्र एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. एकनाथ खडसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं केशव उपाध्येंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.

महत्त्वाची बातमी : एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, जयंत पाटलांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागत केलंय ‘ही खूप आनंदाची बातमी आहे, खडसेंचं महाविकास आघाडीच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणालेत. 

official reaction of BJP on the resignation of eknath khadse


 

loading image