दोन तास चार्ज करा, 120 किलोमीटर पळवा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

ओकिनावातर्फे इलेक्‍ट्रिक स्कूटर "क्रूझर' सादर

मुंबई  : सध्या ग्रेटर नोएडा येथे ऑटो एक्‍स्पो 2020 सुरू असून यात अनेक कंपन्या आपल्या नवनवीन मॅाडेलच्या गाड्या सादर करत आहेत. अगदी मालवाहू गाड्यांपासून ते आलिशान सीडॅन कार्सपर्यंत ते एसयूव्हीपासून इलेक्ट्रीक स्कूटरपर्यंत विविध वाहने आतापर्यंत या कार्यक्रमात सादर करण्यात आली आहेत. 

हेही वाचा - एमजी इंडियाद्वारे मार्व्हल एक्सचे अनावरण

यातच भारत सरकारच्या "मेक इन इंडिया' या उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणारी भारतीय कंपनी ओकिनावाने ओकिनावाच्या प्रोटोटाइप मॅक्‍झी-स्कूटर "क्रूझर'चे अनावरण केले आहे. सर्व आधुनिक तंत्रज्ञानायुक्त ही नवीन स्कूटर वेग, बॅटरी बॅकअप अशा सर्वच बाबींत अव्वल आहे.

हेही वाचा - होम अप्लायन्सेसची मागणी वाढतेय.

भारत सरकारच्या नीती आयोगाचे मिशन संचालक अनिल श्रीवास्तव यांच्या हस्ते या नव्या स्कूटरचे अनावरण करण्यात आले. ओकिनावाची ही नवी क्रूझर स्कूटर 100 किमी प्रतितासाच्या वेगाने धावू शकणार आहे. तसेच तिच्यात आधुनिक बॅटरी बसवण्यात आली आहे, ज्यामुळे या स्कूटरची बॅटरीक्षमता अधिक काळ टिकणार आहे. तसेच या स्कूटरसोबत हाय-स्पीड चार्जर देण्यात आला असल्याने अवघ्या 2 ते 3 तासांमध्ये बॅटरी संपूर्ण चार्ज होऊ शकणार आहे. तसेच एका चार्जमध्ये ही स्कूटर 120 किमीपर्यंतचे अंतर कापू शकणार आहे. 
 

web title : Okinawa presents electric scooter "cruiser"

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Okinawa presents electric scooter "cruiser"