esakal | OLA CAB : भाडे दरात 20 टक्याने वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री
sakal

बोलून बातमी शोधा

Ola Cabs

OLA CAB : भाडे दरात 20 % वाढ, प्रवाशांच्या खिशाला कात्री!

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : उबर कंपनीने (Uber Company) आपल्या चालकांना मदत म्हणून नियोजित भाड्याच्या (Rent) 15 टक्के दरात वाढ केली आहे. त्यानंतर आता ओला कंपनीने सुद्धा अॅप बेस्ड टॅक्सी चालकांना (Taxi Driver) मिळणाऱ्या भाडेदरात 20 टक्याने वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना (Mumbaikar) आधीच महागाईच्या झळा बसत असताना आणि सार्वजनिक प्रवासी सेवा बंद (Public Transport) असताना आता ओला,उबरच्या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ( OlA company increases twenty present rent like Uber costly to travelers )

कोरोनाच्या महामारीच्या काळात आधीच अॅप बेस्ड टॅक्सी व्यवसाय डबघाईस आला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सध्या टॅक्सी व्यवसाय सुरू असला तरी, प्रवाशी संख्येच्या बंधनामुळे टॅक्सी चालकांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे ओला, उबर टॅक्सी चालकांना मदत म्हणून दोन्ही कंपनीने आपले भाडे वाढविण्याचा निर्णय सध्या जाहीर केला आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला! सोमवारी 27,827 चाचण्या

यामध्ये उबर कंपनी यापूर्वी 7.50 रुपये प्रति किलोमीटर दर मिळायचा. मात्र आता त्यामध्ये 15 टक्के वाढ करून, 10 रुपये प्रति किलोमीटर भाडे केले आहे. त्याप्रमाणेच ओला कंपनी यापूर्वी 8 रुपये प्रति किलोमीटर दर आकारात होते. मात्र, आता 8 ऐवजी 10 रुपये प्रति किलोमीटर मध्ये घेतले जाणार असून, उबर नंतर ओलाने ही आपले भाडे दर वाढवून आपल्या टॅक्सी चालकांना कळवले आहे.

टॅक्सी चालकांना दिलासा, सर्वसामान्यांना फटका!

ओला, उबर कंपन्यांना अद्याप राज्यात परिवहन विभागाच्या अंतर्गत टॅक्सी प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही. त्यामुळे या टॅक्सी कंपण्यांचं प्रवासी भाडे दर ठरवून आणि टॅक्सी चालक संघटनांच्या मागणीवरून भाडे दर निश्चित करते. त्यामुळे सध्या टॅक्सी चालकांना जरी या भाडेवाढीचा दिलासा मिळाला असला तरी, ऐन महामारीच्या मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

loading image