मुंबई : ओला चालकानं अनेक वाहनांना उडवलं, विद्यार्थ्यांसह आठ जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

मुंबई : ओला चालकानं अनेक वाहनांना उडवलं, विद्यार्थ्यांसह आठ जण जखमी

मुंबई : घाटकोपरच्या सुधा पार्क परीसरात एक भीषण अपघात घडला असून एका ओला चालकाने आठ जणांना उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन रिक्षा एक टेम्पो आणि दोन दुचाकीस्वारांना या ओला चालकाने उडवल्याने खळबळ उडाली. अनेक जण या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी या ओला चालकाला ताब्यात घेतले असून या अपघातामागील नेमक्या कारणांचा खुलासा अद्याप झालेला नाही. हा ओला चालक वाहन चालवताना कुठल्या नशे आमलाखाली होता का याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. या अपघातानंतर रुग्णालयात आठ जणांना दाखल करण्यात आले आहे, यामध्ये तीन विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे, रस्त्यावर चालताना अचानक या चलकाच्या गाडीने वेग घेतला आणि रस्त्यात उभ्या असलेल्या सर्वांना उडवत निघून गेला. या अपघातातील जखमींची सख्या आणखी वाढू शकते अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Video: CM शिंदेंच्या भाषणाआधीच सभेतून लोक निघाले; नेत्यांना आवरतं घ्यावं लागलं भाषण

Web Title: Ola Driver Hit Several Vehicles In Ghatkopar 8 People Injured In The Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai News