Ola Uber Strike: कॅबचालकांच्या संपाचा प्रवाशांना फटका! ओला-उबरचा प्रवास महागला; तब्बल 'इतकी' दरवाढ केली
Ola-Uber Fare Price hike: राज्यातील रिक्षा आणि कॅबचालक यांनी बेमुदत बंद पुकारला असून ॲप-आधारित टॅक्सी सेवा १५ जुलैपासून बंद आहेत. याचा गैरफायदा घेत ॲपवर आधारित कंपन्यांनी भाडे वाढवले आहे.
मुंबई : ओला, उबर, रॅपिडोसारख्या कंपन्यांमुळे ग्राहक तसेच चालकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी राज्यातील रिक्षा आणि कॅबचालक यांनी बेमुदत बंद पुकारला. याचा गैरफायदा घेत ॲपवर आधारित कंपन्यांनी भाडे दुप्पट केले आहे.