esakal | Vaccine Update : 'या' वयोगटातील नागरिकांचे ५० टक्के लसीकरण पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

old age people

Vaccine Update : 'या' वयोगटातील नागरिकांचे ५० टक्के लसीकरण पूर्ण

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड -19 लसीकरणासाठी (Corona Vaccines) पात्र असणाऱ्या प्रत्येक सहाव्या मुंबईकराचे आता पूर्ण लसीकरण केले गेले आहे. मात्र, शहराच्या लसीकरणाच्या आकडेवारीकडे (Vaccination Details) बारकाईने लक्ष दिल्यास 50 % ज्येष्ठ नागरिकांचे जे सार्स कोविड 2 या विषाणूमुळे सर्वाधिक असुरक्षित मानले गेले आहेत त्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पहिला डोस (First Dose) घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 90 लाख लोकांपैकी 55% लोकांनी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी पहिला डोस घेतला आहे. गेल्या वर्षी महानगरपालिकेच्या (BMC) 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'च्या सर्वेक्षणात 11 लाख ज्येष्ठ नागरिकांची गणना करण्यात आली असून त्यातील 88.8 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ( Old Age People Corona Vaccination Above Sixty age fifty percent done - nss91)

हेही वाचा: Mumbai Rain: तुंबलेल्या पाण्यातून रितेश घरातील सामान आणायला गेला अन्...

16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेला सहा महिने पूर्ण झाले असून मुंबई शहराच्या लसीकरणाचे प्रमाण महाराष्ट्र आणि भारताच्या आकडेवारीपेक्षा जास्त दिसते. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी त्यांच्या घराबाहेर जाण्याची शक्यता कमी आहे.  पण, किमान ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत असे म्हणू शकतो की मुंबईच्या 60 वर्षांवरील नागरिकांपैकी निम्म्या लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले  आहे." सोमवारी पालिकेच्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार,  मुंबईतील 11 लाख ज्येष्ठ नागरिकांपैकी 9.77  लाख ज्येष्ठ नागरिकांनी कोविड -19  लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 5.58 लाख दोन्ही डोस घेतले आहेत.

loading image