एका पूलाने केला मुरबाडचा मार्ग बंद

कळंब पूल
कळंब पूल
Updated on

अलिबाग (बातमीदार) : कर्जत-मुरबाड मार्गावरील पोश्री नदीवर कळंब येथील जुना पूल कमकुवत झाला आहे. या संदर्भात रस्तेविकास महामंडळाने इशारा देणारा अहवाल दिला आहे. त्याची दखल घेत रायगड जिल्हा प्रशासनाने  या मार्गावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. 

शहापूर- मुरबाड- कर्जत- खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या मजबुतीकरणाचे काम केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. 

त्यासाठी काही जुने पूल पाडून नवीन पूल आणि सुस्थितीत असलेल्या पुलाच्या जागी अतिरिक्त पूल बांधण्यात येत आहेत. परंतु मुरबाड-कर्जत दरम्यानच्या पोश्री नदीवर असलेल्या कळंब या ४५.७०४ मीटर लांबीच्या पुलाची स्थिती बिकट आहे. त्यामुळे त्यावरून अवजड वाहतूक सुरू राहिल्यास तो कोसळण्याचा धोका आहे.

या पार्श्‍वभूमीवर रस्ते विकास महामंडळानेही धोक्‍याचा इशारा देणारा अहवाल दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यावरील अवजड वाहतूक बंद केली आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलिस प्रशासन यांनी दिलेल्या अहवालानुसार रायगड जिल्हा प्रशासनाने कळंब येथील पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली आहे. 
- वैशाली परदेशी, प्रांत अधिकारी, कर्जत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com