काय सांगता! 'एनएमएमटी'च्या जून्या बसमध्ये स्वच्छतागृह होणार? भाजप आमदारांच्या मागणीला आयुक्तांचा हिरवा कंदील

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

एनएमएमटीच्या बंद पडलेल्या जून्या बसेस भंगारात देण्याऐवजी त्या बसेसमध्ये महिलांसाठी खास स्वच्छता गृह तयार करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई : एनएमएमटीच्या बंद पडलेल्या जून्या बसेस भंगारात देण्याऐवजी त्या बसेसमध्ये महिलांसाठी खास स्वच्छता गृह तयार करण्यात येणार आहेत. शहरात महत्वांच्या मार्गांवर दहा ठिकाणी या बस महिलांच्या सोयीसाठी ठेवण्यात येणार आहेत. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी यांनी टाकाऊ पासून टीकाऊच्या धर्तीवर केलेल्या अनोख्या कल्पनेला आयुक्त अभिजीत बांगर यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. 

मुंबईतील लोकल सेवा कधी सुरु होणार? यावर राजेश टोपे म्हणतात, नागरिकांची मागणी रास्त...

स्वच्छतेच्या बाबतील नवी मुंबई हे शहर रा्ज्यात पहिले तर देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जात आहे. शहरातील सुटसुटीत रस्ते, हिरवेगार बगीचे, मोकळी मैदाने, निटनेटके शाळा इमारती आदींबरोबरच ठिक-ठिकाणी स्वच्छता गृह महापालिकेने तयार केली आहेत. अलिकडच्या काळात महापालिकेने स्वतः आणि काही सीएसआर फंडाच्या माध्यमातून ई-टॉयलेट ही संकल्पनाही आणली होती. मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सद्या पालिकेने महत्वांच्या ठिकाणी स्वच्छतागृह तयार केली आहेत. त्यांचा वापर महिला वर्गासह इतरांनाही करता येतो. परंतू शहरातून जाणारे शीव-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर, पामबीच मार्ग या मार्गांच्या शेजारी स्वच्छता गृह नसल्यामुळे अनेकदा प्रवास करताना महिलांची कुचंबना होत असते. पालिकेने काही ठिकाणी उपलब्ध करून दिलेले ई-टॉयलेट्स प्रत्येकवेळी कामास येत नाही. अशापरिस्थितीत एनएमएमटीच्या ताफ्यात असलेल्या जून्या बसेसचा अत्याधुनिक स्वच्छतागृह तयार करून देण्यात चांगला उपयोग होऊ शकतो अशी कल्पना मंदा म्हात्रे यांनी बांगर यांच्याकडे मांडली.

पोटगीची रक्कम थकवणाऱ्या नवऱ्याला न्यायालयाचा दणका; मालमत्ता गोठवण्याचे दिले आदेश

म्हात्रे यांनी आज भाजपच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसोबत जाऊन बांगर यांची भेट घेतली. या भेटीत एनएमएमटीतील टाकाऊ व जून्या झालेल्या बसेस भंगारात देण्यापेक्षा महिलांसाठी स्वच्छतागृह म्हणून वापरता येऊ शकतात अशी मागणी केली. म्हात्रे यांनी त्यांच्या आमदार निधीतून शहरात अनेक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र पालिकेने या बसेस दिल्या तर त्यांचा वापर फिरते स्वच्छतागृह म्हणूनही करता येऊ शकतो. तसेच या बसेसमध्ये महिलांसाठी विविध सोयी असलेले चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह तयार करता येऊ शकते. पुणे महापालिकेने अशा जून्या बसेसचा वापर स्वच्छतागृहांसाठी केल्या असल्याने आपल्यालाही आपल्या शहरात महिलांसाठी सुविधा करता येऊ शकते, त्यामुळे महिलांना प्रवास करताना सुविधा निर्माण होऊन रोगराई पसरणार नाही, असे मत म्हात्रे यांनी बैठकीत मांडले.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या सोबतचा 'तो' खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

आमदार निधीच्या माध्यमातून दहा जून्या बसेसचे रुपांतर स्वच्छतागृहात  करून नंतर त्या पालिकेच्या स्वाधिन केल्या जाणार आहेत. म्हात्रे यांनी मांडलेल्या या कल्पनेला बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मान्यता दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या प्रसंगी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, माजी सभापती संपत शेवाळे, माजी नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक दीपक पवार, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले उपस्थित होते. 

 

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात माझ्या आमदार निधीतून अनेक सार्वजनिक स्वच्छता गृहे बांधण्यात आलेली आहेत. परंतु खास महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छता गृहांची संख्या अगदी नगण्य असल्याने महिलांची सतत गैरसोय होते. महिलांकरिताही सुसज्ज असे मोबाईल टॉयलेट किंवा स्वतंत्र स्वच्छता गृह असावे अशी मागणी एक महिला आमदार म्हणून माझ्याकडे अनेक महिलांकडून नेहमीच होत असते. या महिलांना या स्वच्छतागृहांचा फायदा होईल. 
 

मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

--------------------------------------

Edited by Tushar Sonawane 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old NMMT bus to have toilet? Commissioner gives green signal to BJP MLAs' demand