Vasai Virar News : अखेर वसई विरार महानगरपालिकेत जुनी पेंशन योजना लागू; चरण भट्ट यांच्या पाच वर्षांच्या अथक परिश्रमांना अखेर यश

तीनशेहून अधिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा बहुप्रतीक्षित लाभ!
vasai virar municipal corporation

vasai virar municipal corporation

sakal

Updated on

विरार - वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) स्थापन झाल्यानंतर तब्बल १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा (OPS) प्रश्न अखेर शिवक्रांती जनरल कामगार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ऐतिहासिकरित्या मार्गी लागला आहे. महानगरपालिकेच्या महासभेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्याने तीनशेहून अधिक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला असून त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या दीर्घ संघर्षाचा अखेर विजय झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com