सावधान ! घरच्याघरी कोरोना टेस्ट करून घेण्याच्या विचारात आहात, एक मिनिट आधी ही बातमी वाचा आणि सजग व्हा...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

कोरोना आला, लॉकडाऊन लागला, अशात चोरटयांनी लोकांना गंडा घालण्याचे नव-नवीन पर्याय अवलंबायला सुरवात केली.

मुंबई - कोरोना आला, लॉकडाऊन लागला, अशात चोरटयांनी लोकांना गंडा घालण्याचे नव-नवीन पर्याय अवलंबायला सुरवात केली. यामध्ये OTP फ्रॉड, ऑनलाईन फसवणूक यांचं प्रमाण कमालीचं वाढलं. हे कमी होतं की काय, कारण आता चोरटयांनी लोकांची फसवून करण्याचा नवीन मार्ग शोधून काढलाय.

मुंबईतील लोकांना आम्ही कोरोनाच्या प्रसिद्ध लॅबमधील तंत्रज्ञ असल्याचं भासवून हे भामटे पैसे उकळत उकळतायत. दक्षिण मुंबईतील एका कॅन्सरग्रस्त वृद्ध महिलेची अशीच फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकळ्यात. या इसमाचे आणखी कुणी साथीदार आहेत का,  त्याचसोबत त्याने आणखी कुणाला फसवलंय का याचा पोलिस तपास करतायत. 

मोठी बातमी - आपला अभ्यास चुकीचा असल्याची लॅन्सेटची कबुली, १९७ वर्षात पहिल्यांदा मागे घेतला 'हा' अभ्यास...

नक्की घडलं काय ? 

सध्या कोणत्याही आजारावर उपचार घ्यायचे असतील तर डॉक्टरांकडून कोरोना चाचणी करून मगच पुढे ट्रीटमेंट केली जाते. अशात या वृद्ध महिलेला देखील कॅन्सरवर उपचार घ्यायचे होते. डॉक्टरांनी आधी कोरोना टेस्ट करून घ्या असं सांगितलं. यानंतर या वृद्ध महिलेच्या मुलीने चौकशी करून घरी येऊन कोविड टेस्ट करणाऱ्या अब्दुल गफार खान याबाबत माहिती मिळवली. अब्दुलने स्वतःला प्रसिद्ध कोरोना लॅबमधील व्यक्ती असल्याचं भासवलं होतं. अब्दुलला घरी बोलावलं असता तो PPE किट घालून घरी आला. त्याने वृद्ध महिलेची SWAB टेस्ट केली आणि त्याबदल्यात सहा हजार रुपये घेतलेत. यानंतर दोन दिवसानंतर त्याने रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं फोन करून  कळवलं. 

मोठी बातमी -  केवळ स्पर्शाने कोरोना होतो का ? तज्ज्ञ समितीने हायकोर्टात स्पष्ट केलं की... 

मग कसं समजलं अब्दुल भामटा होता.. 
 
वृद्ध महिलेला कॅन्सरचे उपचार घ्यायचे होते. यासाठी या महिलेचे रिपोर्ट कॅन्सर डॉक्टरांकडे देणं गरजेचं होतं. मात्र छापील रिपोर्ट मिळत नसल्याने या महिलेच्या मुलीने अब्दुलकडे फोन करून रिपोर्टचा तगादा लावल्यानंतर अब्दूलने उडवा-उडवीची उत्तरं दिलीत. वृद्ध महिलेच्या मुलीने लॅबमध्ये फोन केला असता आमच्याकडे असा कुणीही काम करत नसल्याचं उघड झालं. यानंतर याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली.

old woman cheated by using name of famous covid19 testing lab man under arrest 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old woman cheated by using name of famous covid19 testing lab man under arrest