

Omi Kalani
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगरच्या राजकारणात वर्षानुवर्षे प्रभाव राखणाऱ्या कलानी कुटुंबाबाबत सुरू असलेल्या चर्चेला युवा नेते ओमी कलानी यांच्या वक्तव्यामुळे नवे वळण मिळाले आहे. महापौर अश्विनी निकम १०० टक्के माझ्या म्हणण्यानुसार काम करतात, असा थेट दावा ओमी कलानी यांनी पत्रकारांशी बोलताना केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे महापालिकेतील विकासकामे 'कलानी महल'मधून हलतात का, असा सवाल उपस्थित झाला आहे.