
पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे करोडोंचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. परंतु, मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात प्रशासन अपयशी ठरली आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये या मार्गावर ३३५ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे वेगाच्या नादात अनेकजण मृत्यूच्या दारातच पोहोचले आहेत.