'पडळकरांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार', फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र | Devendra fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray

गोपीचंद पडळकरांच्या सुरक्षेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या (Gopichand padalkar) जीवाला धोका असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. बहुजनांच्या बाजूनं उभ राहिल्यानं यातून दुखावलेले लोक गोपीचंद पडळकरांवर सातत्यानं हल्ला करत आहेत, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

"लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्यांच्या जिवास धोका आहे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीसांनी पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

"त्यांच्या जिवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या" अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडेही पत्राद्वारे मागणी केली आहे.

हेही वाचा: काबूल पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरलं, इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पडळकरांच्या गाडीवर हल्ला केला होता, तर सांगलीतही पडळकरांच्या गाडीवर तुफान दगडफेक करत प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

loading image
go to top