'आमच्याकडे ती माहिती आहे', अदर पुनावाला धमकी प्रकरणात शेलारांचे सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अदर पुनावाला-आशिष शेलार

अदर पुनावालांना धमकी, भाजपा कोणाला उघडं पाडणार?

अदर पुनावाला धमकी प्रकरण, शेलारांचा सूचक इशारा

मुंबई: "मला धमक्या मिळत आहेत आणि सत्य बोललो तर माझं शीर कापलं जाईल" असं खळबळजनक विधान सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी लंडनच्या 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. या संदर्भात आज भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर ते बोलताना म्हणाले की, "अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे."

हेही वाचा: चांगली बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर

"केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. आज यावर राजकारण करायचं नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे असे शेलार म्हणाले. "या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं" असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.

Web Title: On Serums Adar Poonawala Row Bjps Asish Shelar Warning To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top