जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्त्याच्या विस्तारासाठी दीड हजार झाडांवर कुऱ्हाड?

जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्त्याच्या विस्तारासाठी दीड हजार झाडांवर कुऱ्हाड?

मुंबई: जोगेश्‍वरी विक्रोळी जोड रस्त्याचा विस्तार त्याच बरोबर मेट्रोच्या दोन टप्प्यांच्या कामासाठी दीड हजार झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. याबाबत महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने नागरिकांकडून सूचना आणि हकरती मागवल्या आहेत.

विक्रोळी जागेश्‍वरी जोड रस्त्याचा विस्तार अंधेरी पश्‍चिम येथील लोखंडवाला संकुलापर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी अंधेरी पश्‍चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गा पासून 1 किलोमीटर लांबीचा आणि 120 फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या आड 720 झाडे येत आहे. त्यातील 600 झाडे इतर ठिकाणी पुनर्रोपित करणे आणि 120 झाडे कापण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

अंधेरी डी. एन.नगर ते मानखुर्द मंडालापर्यंत मेट्रोच्या 2बी प्रकल्पाच्या आड 780 झाडे येत आहे. ही झाडे कापणे अथवा पुनर्रोपित करण्याबाबत महानगर पालिकेने सूचना आणि हकरती मागवल्या आहेत. यातील 400 झाडे कापणे आणि 380 झाडे पुनर्रोपित करण्याबाबत सूचना आणि हकरती मागविण्यात आल्या आहेत. वडाळा ठाणे या मेट्रोच्या टप्प्यासाठी 200 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे. त्याबातही सूचना आणि हकरती मागविण्यात आल्या आहेत.

महानगरपालिका झाडे कापण्या पेक्षा पुनर्रोपित करण्याला प्राधान्य देत आहे. मात्र, पुनर्रोपित केलेली झाडे जगण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. काही दिवसांपूर्वी शिवडी न्हावा शेवा मार्गसह इतर सार्वजनिक प्रकल्पांसाठी शेकडो झाडे कापण्याची आणि पुनर्रोपित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

One and a half thousand trees will cut work Jogeshwari Vikhroli Road

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com