

Arrrest
अलिबाग: जिमसाठी जाणाऱ्या तरुणांना तसेच साहसी खेळ खेळणाऱ्या तरुणांना बेकायदेशीरपणे नशेची इंजेक्शन पुरविणाऱ्या आक्षी साखर येथील एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मिपेंटर्मीन सल्फेट नावाच्या नशेच्या औषधाच्या १० बाटल्या, इंजेक्शन, ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.