
मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांचे स्थलांतर मुलुंडमध्ये करण्याच्या विरोधात मुलुंडकरांनी आवाज उठवत महाविकास आघाडीच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आयोजित केले. मुलुंड पूर्व येथे पार पडलेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.