Thane Immersion Accident : विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; मंडपावर झाड कोसळून एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

One dead four injured due to falling tree in Thane mumbai

Thane Immersion Accident : विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; मंडपावर झाड कोसळून एकाचा मृत्यू

ठाणे : ठाण्यातील कोलबाड, जाग माता मंदीर जवळ असलेल्या कोलबाड मित्र मंडळ या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात आरती चालू असताना मंडपावर व दोन पार्क केलेल्या गाड्यांवर झाड कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत राजश्री वालावरकर ( ५५ ) यांचा मृत्यू झाला असून प्रतिक वालावरकर (३०),सुहासिनी कोलुंगडे (५६),कीविन्सी परेरा ( ४०), आणि दत्ता जावळे (५०) हे चौघे जखमी झाले आहेत. तर दोन दुचाकींचे आणि गणपती मंडपाचे नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

Web Title: One Dead Four Injured Due To Falling Tree In Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..