वरळी येथील इमारतीच्या लिफ्टमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

अनिश पाटील
Monday, 7 September 2020

वरळी येथील वेनू हिस्ता इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून कोहिनूर इलेक्ट्रॉनिकच्या मालकाचा रविवारी (ता. 6) मृत्यू झाला.

मुंबई : वरळी येथील वेनू हिस्ता इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून कोहिनूर इलेक्ट्रॉनिकच्या मालकाचा रविवारी (ता. 6) मृत्यू झाला. विशाल मेवानी (46) असे त्यांचे नाव आहे. ते लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती इमारतीतील सुरक्षा रक्षकाला मिळताच त्याने लिफ्ट खाली आणण्याचा प्रयत्न केला. परंतु लिफ्ट खाली येईपर्यंत मेवानी यांचा गुदमरून मृत्यू झाला.  

मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

वरळी येथील पोचखानावाला रोड, ओम रतन इमारतीजवळील वेनू हिस्ता इमारतीची लिफ्ट रविवारी (ता. 6) संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बंद पडली. या इमारतीत कोहिनूर इलेक्ट्रॉनिकचे मालक विशाल मेवानी  (46) यांचे घर आहे. लिफ्टमधून ते घरीच जात होते. त्याच वेळी लिफ्ट बंद पडली. ही माहिती इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मिळताच त्याने धाव घेत लिफ्ट खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मध्येच लिफ्ट अडकली. यादरम्यान गुदमरून मेवानी लिफ्टमध्ये कोसळले. नंतर त्यांना ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाचे अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies after suffocating in elevator at Worli building; Police are investigating the incident