esakal | कर्करोगाच्या तीन हजार रुग्णांसाठी भारतात एकच डॉक्‍टर
sakal

बोलून बातमी शोधा

one doctor in India for three thousand cancer patients

कर्करोगाच्या तब्बल तीन हजार रुग्णांमागे केवळ एक तज्ज्ञ डॉक्‍टर असल्याची माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

कर्करोगाच्या तीन हजार रुग्णांसाठी भारतात एकच डॉक्‍टर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णसंख्येच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या अत्यल्प आहे. कर्करोगाच्या तब्बल तीन हजार रुग्णांमागे केवळ एक तज्ज्ञ डॉक्‍टर असल्याची माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात कर्करोगाचे जवळपास ३५ ते ४० लाख रुग्ण असून दरवर्षी सात ते आठ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. तसेच दरवर्षी १० लाखांहून अधिक कर्करोगाच्या नव्या रुग्णांची नोंद होते. २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतात ११ लाख ५७ हजार नव्या कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे; मात्र वाढत्या रुग्णांच्या तुलनेत कर्करोगाच्या उपचारात नैपुण्य मिळवलेल्या डॉक्‍टरांची संख्या प्रचंड कमी आहे. अमेरिकेत ३९० रुग्णांमागे एक डॉक्‍टर आहे; तर भारतात अडीच ते तीन हजार रुग्णांमागे एकच डॉक्‍टर आहे. विशेष म्हणजे त्यातील ७० टक्के  डॉक्‍टर हे शहरी भागात असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारांसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे भारतातील डॉक्‍टरांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सध्याचे दोन ते तीन हजार रुग्णांमागे एक डॉक्‍टर हे प्रमाण दोन हजार रुग्णांपेक्षा कमी करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

खातेवाटपाची कोंडी सुटेना; काँग्रेस म्हणते, 'शब्द पाळला गेला नाही...'

भारतात खास कर्करोगासाठी २७ ते २८ रुग्णालये आहेत. तसेच ३०० च्या आसपास रुग्णालयांत कर्करोगासाठी स्वतंत्र विभाग आहे; मात्र रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत तुटपुंजी आहे. कर्करोगाच्या तज्ज्ञांची आणि रुग्णालयांची संख्या कमी असण्याचे कारण म्हणजे कर्करोग तज्ज्ञांच्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या कमी जागा होय. डॉक्‍टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णसेवेवरही ताण येतो. भारतात कर्करोगाबद्दलची भीती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनी उपचारासाठी जास्त वेळ द्यावा अशी अपेक्षा रुग्णांची असते; मात्र प्रचंड ताणामुळे डॉक्‍टरही रुग्णांना अपेक्षित वेळ देऊ शकत नाहीत.

विशेषज्ज्ञांसोबतच सर्जनची गरज
देशात कर्करोगाच्या उपचारांसाठी विशेषज्ञांची गरज आहे; मात्र एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विशेषज्ज्ञ तयार होणे शक्‍य नाही. त्यामुळे कर्करोग विशेषज्ज्ञांची जशी गरज आहे, त्याप्रमाणे कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जनचीही आवश्‍यकता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कर्करोगाचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था
प्रकार    संस्था    एकूण जागा 
मेडिकल ऑन्कोलॉजी    २९    ८७
क्‍लिनिकल हेमिटोलॉजी    ९    १८
रेडिएशनल ऑन्कोलॉजी    ८६    २२९
सर्जिकल ऑन्कोलॉजी    ३२    ८९

loading image
go to top