कलम 353 अंतर्गत मुंबईतही अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल

कलम 353 अंतर्गत मुंबईतही अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात रायगडनंतर आता मुंबईतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आता अर्णब गोस्वामी यांच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होताना पाहायला मिळतेय. 

आज सकाळी पोलिस अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यास गेले असताना पोलिसांशी गैरवर्तन करणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, या आरोपांखाली मुंबईत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील लोअर परळच्या ना. म. जोशी पोलिस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जातंय.

याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा हात उचलला नाही. पोलिसांनी सर्वात आधी घरी जाऊन आरोपीच्या नातेवाईकांना अटक करण्याचं कारण सांगितलं. हे सर्व करत असताना अर्णब गोस्वामी यांच्या पत्नीकडून सर्व घटनाक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु होतं. पोलिसांकडून त्यांच्या पत्नीच्या डॉक्युमेंट्सवर सह्या घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी साह्य देखील करण्यास नकार दिला. अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोलिस अटकेसाठी गेले असता त्यांनी दीड तास दार देखील उघडलं नाही. त्यानंतर देखील अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांना सहकार्य केलेलं नाही. म्हणून मुंबईतील ना म जोशी पोलिस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आता मुंबईतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

one more case registered under section 353 against arnab gowami in N M joshi police station

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com