"आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास", अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर नाईक कुटुंबीयांची प्रतिक्रिया

"आम्हाला न्याय मिळेल हा विश्वास", अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर नाईक कुटुंबीयांची प्रतिक्रिया

मुंबई : अर्णब गोस्वामी यांच्या कंपनीकडून केलेल्या कामाचे पैसे मिळाले असते, तर आज माझे पती जिवंत असते. माझ्या पतीने सुसाइट नोटमध्ये अर्णब गोस्वामीसह तीन जणांची नावं लिहिली होती. तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. महाराष्ट्र पोलिसांनी आज केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे, आम्ही वाट पाहणार. या शब्दात अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अर्णब गोस्वामी यांच्या एआरजी आउटलायर या कंपनीचा मुंबईतील स्टुडिओ उभारण्याचं काम माझ्या पतीने केलं होतं. परंतु या कामाचे 83 लाख रुपये त्यांनी थकवले. तुला पैसे मिळणार तर नाहीच, पण जे मिळालेत ते पण मी वसूल करतो, अशी धमकी देत अर्णबने इतर देणेकऱ्यांनानाही संपर्क साधून त्यांनाही आमच्याविरोधात भडकवलं. त्यामुळे आमचे कामगार सोडून चालले होते. इतर कामंही मिळत नव्हती. अर्णबने सूडबुद्धीने हे सर्व केलं. माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते आज जिवंत असते. आम्हाला राजकारण करायचे नाही आहे. पण माणूस म्हणून आम्हाला पाठींबा द्या. आम्ही पंतप्रधानांपासून अनेकांना ई-मेल पाठवून न्याय मागितला, असेही यावेळी नाईक यांनी सांगितले.

पैशांवरून अर्णबकडून सातत्याने आमच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यावरून आमची पोलिसांत तक्रार करण्याविषयी चर्चाही झाली होती. परंतु मुलीचं करिअरही उद्ध्वस्त करण्याची अर्णबने धमकी दिली होती. मार्केटमध्ये दुसरी कामं घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे रिपब्लिकचं काम हेच त्यांचं शेवटचं प्रॉजेक्ट होतं, वडिलांपुढे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नसल्यानेच त्यांनी हे पाऊल उचललं, असं अन्वय नाईक यांच्या मुलीने सांगितलं.

माझ्या पतीने अर्णब गोस्वामीसह तीन जणांची नावं सुसाईड नोटमध्ये घेतली होती. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पोलीस उपमहासंचालकांच्या कार्यालयात नेऊन त्यांचा जबाबात नोंदवण्यात आला. अर्णव गोस्वामीला व्हिआयपी ट्रिटमेंट देण्यात आली, असा आरोपही अक्षरा नाईक यांनी केला.

first reaction of naik family after arrest of arnab goswami says we will get justice

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com