आगीतून दोघांना बाहेर काढलं, पण त्यांची मात्र मृत्यूशी झुंज अपयशी! डोंबिवलीच्या चायनिज सेंटर स्फोटातील एकाचा मृत्यू

डोंबिवली पूर्वेतील सिद्धी चायनीज सेंटरमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटातील जखमी राजू राजभर (वय 50) यांचा मृत्यू झाला आहे.
One of injured in Siddhi Chinese Center cylinder blast in Dombivli died during treatment Marathi news
One of injured in Siddhi Chinese Center cylinder blast in Dombivli died during treatment Marathi news

डोंबिवली, ता. 7 - डोंबिवली पूर्वेतील सिद्धी चायनीज सेंटरमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटातील जखमी राजू राजभर (वय 50) यांचा मृत्यू झाला आहे. गेले 9 दिवस सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज अखेर गुरूवारी संपली आहे. चायनीज सेंटर मध्ये आग लागल्यानंतर राजू हे आग विझविण्यासाठी तसेच तेथील लोकांना बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावले. दोन जणांना त्यांनी वाचविले देखील मात्र त्यानंतर झालेल्या सिलेंडर स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते.

डोंबिवली पूर्वेकडील सांगार्ली गावात राजू राजभर कुटुंबीयांसह राहत होते. बुधवारी 29 मेला दुपारच्या सुमारास ते आपला मित्र समाधान पवार यांच्या सोबत टंडन रोडला होते. हे दोघे ही ड्रायव्हर आहेत. समाधान हे त्याच परिसरात क्रांतीनगर येथे राहतात. बुधवारी गाडी लावून दोघे मित्र स्टेशनच्या दिशेने निघाले होते.

One of injured in Siddhi Chinese Center cylinder blast in Dombivli died during treatment Marathi news
Pune Fire : सदाशिव पेठेतील शैक्षणिक संस्थेत भीषण आग! वसतिगृह व्यवस्थापकाचा होपळून मृत्यू; ४० विद्यार्थीनी थोडक्यात बचावल्या

याच वेळी या रस्त्याला असलेल्या सिध्दी चायनिज सेंटरमध्ये चायनिज पदार्थ बनविण्याची तयारी सुरू असताना सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चायनिज सेंटर बेचिराख झाले. या स्फोटात राजू राजभर याच्यासह 9 जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत चायनीज सेंटरमधील कामगार मदतीसाठी आरडाओरडा करत होते. हे पाहून रस्त्याने जाणाऱ्या राजू व समाधान यांनी धाव घेतली. या आगीत अडकलेल्या दोघांना राजू यांनी बाहेर काढले. मात्र स्वतःही जबर जखमी झाले होते. 30 टक्के होरपळलेल्या राजू यांच्यावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तब्बल नऊ दिवस राजू मृत्यूशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली असून गुरुवारी दुपारी पावणे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सागर्ली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

One of injured in Siddhi Chinese Center cylinder blast in Dombivli died during treatment Marathi news
दिल्लीत महाराष्ट्राचं राजकारण तापलं! फडणवीस राजीनाम्यावर ठाम, उपमुख्यमंत्रीपदी येणार भाजपचा संकटमोचक? 5 नावांची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com