सोशल मीडियावर ट्रेंडिंग 'स्मायली' काढतेय भाजप नेत्यांना चिमटे; पण ही स्मायली आहे तरी कोण ?

सोशल मीडियावर ट्रेंडिंग 'स्मायली' काढतेय भाजप नेत्यांना चिमटे;  पण ही स्मायली आहे तरी कोण ?

मुंबई : कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यात सोशल मीडियाला वापरणाऱ्या लोंकांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सोशल मीडियावर सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट येत आहेत. यात कोरोनाबाबतच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पोस्टचा समावेश आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग असलेल्या 'स्मायलीनं' भाजप नेत्यांना चांगलेच चिमटे काढलेत.

गेल्या काही दिवसांपासुन सोशल मीडियावर 'एक करोड हसणाऱ्या लोकांचा ग्रुप' या नावंनं एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुप महाविकास आघाडीच्या समर्थकांचा आहे. या ग्रुपवर भाजप किंवा भाजप विरोधी पोस्ट टाकली जाते आणि त्याबरोबर एक हसण्याची स्मायली टाकली जाते. त्यांनतर या पोस्टवर कमेंट करणारेही हीच स्मायली कमेंट करतात. विशेष म्हणजे फार कमी काळातच या ग्रुपला तब्बल १३ हजारांच्या वर मेंबर जोडले गेले आहेत.  

राज्यावर कोरोनाचा संकट असताना भाजपचे नेते राज्य सरकारला निधी न देता केंद्र सरकारला निधी द्या असं आवाहन करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या महाविकास आघडीच्या समर्थकांनीं हा ग्रुप तयार केला आहे. मात्र यावर आपली प्रतिक्रिया रागात न देता स्मायलीच्या माध्यमातून देण्याचं त्यांनी ठरवलं आहे.

आतापर्यंत सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, राम कदम, चंद्रकांत पाटील यांना या स्मायलीचा सामना करावा लागला आहे.  यातील काहीनेत्यांनी यावर भाष्यही केलं आहे.

"या संकटच्या काळात जे तुम्ही वागत आहात ते आम्हाला तरुण पिढीला पटण्यासारखं नाहीये. मात्र तुम्ही जे काम करत आहेत ते हास्यास्पद आहे. तसंच या ग्रुपमध्ये महाविकास आघडीचेच नाही तर कुठल्याही पक्षात नसलेले लोकंही सामील आहेत. हे सरकार या संकटाच्या काळातही चांगलं काम करत आहे", असं या ग्रुपचे ऍडमिन योगेश सावंत यांनी म्हंटलंय.

one smiley is taunting BJP and their leaders read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com