esakal | एक असा देश जिथे सुरु आहे २०१३ साल, इथे वर्षात आहेत १३ महिने..
sakal

बोलून बातमी शोधा

एक असा देश जिथे सुरु आहे २०१३ साल, इथे वर्षात आहेत १३ महिने..

एक असा देश जिथे सुरु आहे २०१३ साल, इथे वर्षात आहेत १३ महिने..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवीन वर्ष सुरु झालंय. अशातच लोकांच्या मनात एक वेगळाच उत्साह, जोश पाहायला मिळतोय. कारण जगभरात २०२० चं जोरदार स्वागत करण्यात येतंय. मात्र जगात असा एक देश आहे जो जगाच्या सात वर्ष तीन महिने मागे आहे. आता तुम्ही म्हणाल काहीपण काय सांगताय ? पण हो जगात असा एक देश आहे जिथे अजूनही २०१३ वर्ष सुरु आहे. एवढंच नाही तर या देशात एका वर्षात १२ नाही तर १३ महिने आहेत.  

आता तुम्ही म्हणाल की  हा देश असा कसा ? इथे वर्षात बारा महिने का नाहीत? हा देश जगाच्या सत्त्व वर्ष तीन महिने मागे कसा? तर यांची उत्तरं देखील तितकीच रंजक आहेत. हा देश खूप सुंदर देखील आहे.

मोठी बातमी - ठाकरे सरकारचा भाजपच्या बड्या आमदाराला 'जोर का झटका' 

या देशाचं नाव आहे इथिओपिया , या देशाची राजधानी आहे अदीस अबाबा (Addis Ababa). इथिओपिया हा आफ्रिकेतील सर्वात जुना आणि सर्वात आधी स्वतंत्र झालेल्या देशांपैकी एक देश आहे. आर्मेनिया नंतर इथिओपिया हा देश सर्वात जुना ख्रिश्चन देश मनाला जातो.   

वर्ल्डोमीटर्स एलॅबोरेशन ऑफ लेटेस्ट यूनाइटेड  नेशन्स (Worldometers elaboration of the latest United Nations) च्या आकडेवारीनुसार इथिओपियाची सध्याची लोकसंख्या  जवळजवळ 11.40 करोड एवढी आहे.  

इथिओपिया हा आफ्रिकेतील पुर्वोत्तरेकडील सुंदर देश आहे. या देशाला हॉर्न ऑफ आफिका म्हणजेच आफिकेचं शिंग म्हणून देखील ओळखलं जातं. इथिओपिया हा नायजेरियानंतरचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आफिकेतील देश आहे.

अम्हारिक (Amharic) ही इथियोपियाची अधुकृत भाषा आहे. मात्र या देशात इंग्रजी, इतालवी, फ्रेंच आणि अरबी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. या देशातील मोठ्या शहरांमध्ये तिथली लोकल म्हणजेच ओरोमिन्या (Orominya) किंवा तिग्रीन्या (Tigrinya) ही भाषा बोलली जाते 

धक्कादायक ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''

अदीस अबाबा  हे इथियोपियाच्या राजधानीचं शहर आहे. अफिरकेत शॉपिंग आणि व्यवसायासाठी हे शहर महत्त्वाचं मानलं जातं. याचसोबत एडामा, एडिस जवळ असलेलं आणखीन एक लोकप्रिय शहर. या शहराला Nazret किंवा Nazareth या नावानेदेखील ओळखलं जातं 

आता तुम्ही म्हणाल शहरांची काय माहिती सांगत बसलात. ते 'तेरा महिने सात वर्ष मागे' याबद्दल सांगा..  तर जगभरात सर्वात आधी ज्युलियन कॅलेंडरचा वापर होत असे. त्यानंतर १५८२ मध्ये  ग्रेगोरियन कॅलेंडरची सुरवात झाली. त्यावेळी जवळजवळ सर्व देशांनी या कॅलेंडरचा स्वीकार केला होता. मात्र त्यात काही असे देश होते त्यांना हे कॅलेंडर मेनी नव्हतं. हे देश या कॅलेंडरच्या विरोधात होते. इथिओपिया हा देश देखील नवीन कॅलेंडर विरोधात उभा राहिलेला देश होता. इथिओपियात त्यांचं स्वतःचं इथिओपियन कॅलेंडर वापरण्यात येतं. 

मोठी बातमी  मुंबई महानगरपालिकेत ६८० कोटींचा पाणी घोटाळा

इथियोपियन कॅलेंडर

इथिओपिया या देशाने कधीच ज्युलियन किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला नाही. इथिओपियात इथिओपियन कॅलेंडरचं वापरलं जातं. या कॅलेंडरमध्ये १२ ऐवजी १३ महिने असतात. इथिओपियातील नवीन वर्ष दहा किंवा ११ सप्टेंबररोजी सुरु होतं. यामधील १२ महिने हे तीस दिवसांचे असतात. शेवटचा तेरावा महिना पाग्युमे म्हणून ओळखला जातो. यामध्ये फक्त पाच किंवा सहा दिवस असतात. वर्षात ज्या दिवसांची गणती होत नाही ते दिवस या महिन्यात असतात.  आणि याच इथिओपियन कॅलेंडरप्रमाणे इथे अजूनही २०१३ हे वर्ष सुरु आहे.  

WebTitle : one unique country which is still leaving in 2013 it also has thirteen months in a year

loading image