शवविच्छेदनासाठी आता एक खिडकी योजना

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई - रुग्णाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान नातेवाइकांची होणाऱ्या ससेहोलपटीची दखल अखेर गृह विभाग आणि आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. लवकरच मुंबईतील 10 शवविच्छेदन केंद्रात "एक खिडकी योजना' सुरू होणार आहे. यामुळे शवविच्छेदन, ना हरकत प्रमाणपत्र आणि इतर प्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी रुग्ण येतात. एकूण मृत्यूपैकी 30 टक्के रुग्ण हे मुंबई बाहेरील असतात. रुग्णाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान नातेवाइकांची धावपळ होते. याबाबत नुकतीच महापालिका वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी बैठक बोलावली होती. या वेळी पोलिस शल्यचिकित्सक यांच्यासह डॉक्‍टर उपस्थित होते. मृतदेह अंत्यविधीसाठी मूळ गावी नेताना बऱ्याच अडचणी येतात. पोलिस, महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवताना बराच वेळ खर्च होतो. यावर उपाय म्हणून मुंबईतील 10 शवविच्छेदन केंद्रात एक खिडकी योजना सुरू करण्याचे ठरवले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One window plan for post mortem