उरण जवळ ONGC ची पाईपलाईन फुटली; तत्काळ गळती रोखल्याने मोठा अनर्थ टळला

उरण जवळ ONGC ची पाईपलाईन फुटली; तत्काळ गळती रोखल्याने मोठा अनर्थ टळला

उरण ः ओएनजीसीमध्ये बॉम्बे हाय मधून कच्चे तेल वाहून आणणाऱ्या
तेल वाहिनीला  पिरवाडी किनाऱ्याजवळ गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहून गेले. रविवारी रात्रीच्या वेळी ही गळती सूरू झाली. एखादे अवजड वाहन या पाईपलाईनच्या वरून गेल्यामुळे ही पाईप लाईन फुटली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओएनजीसी प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब ही गळती रोखण्याचे प्रयत्न सूरू करण्यात आले आहेत. 

बॉम्बे हायमधून समुद्रातून काढलेले कच्चे तेल पाईपलाईनद्वारे उरणच्या
ओएनजीसी प्लान्ट मध्ये आणले जाते. यासाठी समुद्रातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. रविवारी या वाहिनीला पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळ गळती लागली. प्रशासनाला या बाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने ही गळती रोखण्याचे काम हाती घेतले. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल वाहून गेले आहे. हे कच्चे तेल समुद्रात मिसळू नये यासाठी ओएनजीसीचे प्रयत्न
सूरू आहेत. सोमवार दिनांक 24 रोजी संध्याकाळपर्यंत ही गळती रोखण्याचे आणि पाईप लाईन दुरूस्त करण्याचे काम सूरू होते. गेल्या वर्षी 3 सप्टेंबरला
ओएनजीसीच्या प्लान्टमधून नाफ्ताची गळती होवू प्रचंड आग लागली होती. या
आगीत अनेक कामगार होरपळले होते. या आगीच्या घटनेला वर्ष पुर्ण होण्याच्या अगोदरच पुन्हा एकदा ओएनजीसीच्या पाईपलाईनमधून तेल गळती झाल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ओएनजीसीच्या पाईपलाईनमधुन कच्चे तेल जमिनीबाहेर येत असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर ओएनजीसीने तत्काळ लिकेज बंद केल्याने कच्चे तेल समुद्रापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. ओएनजीसीच्या घटनास्थळाची पाहणी केली आहे. ओएनजीसीने तातडीने पाइपलाईनच्या दुरुस्तीचे काम केले आहे.त्यामुळे तेलगळती तत्काळ आटोक्यात आली आहे

भाऊसाहेब अंधारे,
तहसिलदार उरण

अद्याप तरी ओएनजीसीने पोलिसात तक्रार अथवा कळविले नाही. तेल गळती दुरुस्तीनंतर बंद झाली आहे. त्यामुळे स्थिती सामान्य आहे

जगदिश कुलकर्णी,
वरिष्ठ पोलिस निरिक्षक उरण

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com