मुंबई - किरकोळ बाजारात कांद्याचे वाढत असलेले भाव विचारात घेता महागाई आटोक्यात राहावी, यासाठी केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथे किलोमागे २४ रुपयांना कांदे विक्रीची योजना सुरू केली आहे. त्यामुळे घरगुती स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असलेला कांदा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याचा विश्वास ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या (एनसीसीएफ) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.