रेल्वे प्रवाशांची तिकिटांसाठी गर्दीच गर्दी, पण कुठे? वाचा बातमी...

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 24 मे 2020

  • रेल्वे प्रवाशांची ऑनलाईन गर्दी!
  • तीन दिवसांत साडेसहा लाख तिकिटे आरक्षित
     

मुंबई : लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे 1 जूनपासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज 100 गाड्यांच्या 200 फेऱ्या चालवणार आहे. त्यानुसार या रेल्वेगाड्यांचे ऑनलाईन तिकीट आरक्षण 21 मेपासून सुरू झाले. त्यानंतर केवळ तीन दिवसांत सहा लाख 52 हजार 644 तिकिटे आरक्षित करणात आली आहेत.

शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

रेल्वे मंत्रालयाने  21 मेपासून आरक्षण खिडक्या, सामायिक सेवा केंद्र (सीएससी) आणि एजंटांमार्फत तिकिटांच्या आरक्षणाला परवानगी दिली. त्यामुळे विशेष रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाला वेग आल्याचे दिसत आहे. देशातील वेगवेगळ्या भागांतून श्रमिक  ट्रेन सोडण्यात येत असून, देशभरातून दिल्लीसाठी वातानुकूलित राजधानी एक्स्प्रेस धावत आहेत. त्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. 

विद्यार्थ्यांचं करिअर बद्दलचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ लॉन्च...

लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या व्यक्ती किंवा आपल्या राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी ही सेवा घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे मिळेल त्या पद्धतीने रेल्वेप्रवासी तिकिटे आरक्षित करत असल्याचे दिसते. आयआरसीटीसीचे संकेतस्थळ, मोबाईल अॅप या माध्यमांतून तिकिटे काढली जात असून, 14 लाख 13 हजार 277 प्रवासी क्षमता असलेल्या या गाड्यांसाठी सहा लाख 52 हजार 644 ऑनलाईन तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online rush of train passengers! Six and a half lakh tickets reserved in three days