विद्यार्थ्यांचं करिअर बद्दलचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’ लॉन्च...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

करिअर निवडीसाठी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई  - विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो. संधी व गरज विचारत घेऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. महाराष्ट्र सरकारकडून एक पोर्टल तयार करण्यात आलंय. या पोर्टलच्या माध्यमातून करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. 

महा करिअर पोर्टलवर जाण्यासाठी इथे क्लिक करा 

करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ चे नुकतेच  उद्घाटन  करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला.

मन सुन्न करणारी बातमी - कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून 10 हजार व्यक्तींनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी केले. राज्यातील 9वी ते 12वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होईल. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.

maharashtra government launches maha career portal for students read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra government launches maha career portal for students read full news