मुंबई : ऑनलाईन वाईन खरेदी पडली महागात, महिला डॉक्टरची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wine

मुंबई : ऑनलाईन वाईन खरेदी पडली महागात, महिला डॉक्टरची फसवणूक

अंधेरी : ऑनलाईन वाईन विक्रीच्या (online wine selling) नावाने एका महिला डॉक्टरची (Female Doctor) फसवणूक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात (malad) उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी (malad police) अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा (Police FIR) नोंदविला आहे.

या प्रकरणातील २९ वर्षांची तक्रारदार महिला ही मालाड परिसरात राहत असून ती डॉक्टर आहे. तीन दिवसांपूर्वी तिने गुगलवरून एका वाईन शॉपचा मोबाईल क्रमांक शोधून काढून वाईनची मागणी केली. गुगल पेद्वारे त्याला दोन हजार रुपये पाठवून दिले. मात्र गुगल पेमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगून बॅंक खात्याची माहिती घेऊन सुमारे दीड लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून तिची फसवणूक केली. अशा प्रकारे अन्य काही जणांचीही फसवणूक झाली असल्याचे समजते.