
मुंबई :मुंबईतील जवळ जवळ सर्वच रस्ते खड्डे मुक्त झाले असून अवघे 146 खड्डे शिल्लक असल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे.तर,आता पर्यंत 440 खड्ड्यांची दुरुस्ती झाली आहे.
महापालिकेडून मिळालेल्या माहिती नुसार 146 खड्ड्यां पैकी 142 खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असून मुलूंड आणि मालाड येथे 1 खड्डा आणि देवनार,मानखुर्द येथे 2 खड्डे आहेत. इतर महानगर पालिकेच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. अशी आकडेवारीच उपलब्ध आहे. मुंबई महानगर पालिकेकडे आतापर्यंत 582 खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातील 543 खड्डे हे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रस्तांवरील असून इतर प्राधिकरणाच्या हद्दीत 66 खड्डे होते.
मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवरील 543 खड्ड्यां पैकी 436 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहे. तर, 142 खड्ड्यांच्या दुरुस्तेचे काम सुरु असून फक्त 4 खड्डे शिल्लक आहेत. महापालिकेच्या "मायबीएएमसी पॉटहोल फिक्स'या संकेत स्थळावरुन ही माहिती उपलब्ध झाली आहे.
मोठी बातमी - "एक तरुण नेता CBI समोर स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं समजतंय"
लॉकडाऊनमुळे उन्हाळ्यात होणाऱ्या रस्ते दुरुस्तीच्या कामाला यंदा फटका बसला आहे. मार्च आणि मे महिन्यात फारसे काम होऊ शकले नाही. मे महिन्यात युध्दपातळीवर कामे पुर्ण करण्यात आली. मात्र, त्या रस्त्यांवरही खड्डे पडत असून काही ठिकाणी अशा खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉकही टाकले जात आहेत.
तरीही एकी नाही
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पावसाळ्यापुर्वी मुंबई महानगर पालिकेसह शहरातील सर्व प्राधिकरणांची बैठक घेऊन यंदा खड्ड्यांवरुन हद्दीचा वाद निर्माण न करता एकत्र येऊन खड्डे दुरुस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. असे आदेश दिले होते. पालिकेसह एकही प्राधिकरणाने असा प्रयत्न केलेला नाही.
only 146 potholes left in mumbai says mumbi municipal corporation
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.