esakal | जबरदस्त! मुंबईत अवघ्या 'इतक्या' हजार रुग्णांवर उपचार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

जबरदस्त! मुंबईत अवघ्या 'इतक्या' हजार रुग्णांवर उपचार सुरु

सध्या मुंबईत अवघे १८ हजारापेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जबरदस्त! मुंबईत अवघ्या 'इतक्या' हजार रुग्णांवर उपचार सुरु

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मुंबईत बुधवारी दिवसभरात १,११८ नवीन रुग्ण आढळलेत. तर बुधवारी मुंबईत दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आल्याचं चित्र दिसून येतेय. त्यातच मुंबईतून दुसरी एक चांगली बातमी येतेय ती म्हणजे, सध्या मुंबईत अवघे १८ हजारापेक्षा कमी रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईत काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचं पाहायला मिळतंय. 

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ८४६ एवढी होती. त्यापैकी ८५ हजार ३२७ पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले असून सध्या एकूण १७ हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील आता १८ हजारापेक्षाही कमी झाला आहे. मुंबई महापालिकेनं याबाबत माहिती दिलीय. 

हेही वाचाः  'मुंबई' महापालिकेसाठी भाजपची तयारी सुरु तर 'ठाणे' जिंकण्याची जबाबदारी 'या' बड्या नेत्यावर

मुंबईत रोजच्या चाचण्यांची संख्या, त्याची सरासरी वाढली असली तरी नवे रुग्ण सापडण्याची सरासरी देखील पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. तसंच प्रभावी उपचारांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलंय. या दोन्ही गोष्टींमुळे उपचार सुरु असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या देखील आता कमी होऊ लागली असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. 

रुग्ण वाढीचा सरासरी दरही कमी 

रुग्ण वाढीचा सरासरी दर मुंबईत १ टक्क्यापेक्षाही कमी झाला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवसांच्या पार गेला आहे. शहरात कोरोनाच्या चाचण्यांनी ५ लाखांचा टप्पा पार केलाय. २८ जुलैला फक्त एका दिवसात ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या. त्या दिवशी मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांक देखील असल्याचं समजतंय. तर २७ जुलैला २४ तासांमध्ये देखील ८ हजार ७७६ चाचण्या करण्यात आल्या.

अधिक वाचाः  हे वाचलंत का? मुंबईत रुग्ण घटल्याने जैविक कचराही कमी; चार महिन्यानंतर प्रमाण 'इतक्या' टक्क्यांनी खाली

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.९७ टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे १ टक्क्याच्याही खाली हा दर आल्यानं मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरलीय.  मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा अभ्यास केला असता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे. मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच ७० च्यापार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता ७२ दिवसांचा झाला आहे.

Less than 18 thousand corona virus patients remain Mumbai

loading image
go to top