Barvi Dam: बारवी धरणात उरला फक्त 31 टक्के पाणीसाठा, बाष्पी भवनामुळे धरणांच्या पातळीत घट

पाण्याची खालावलेली पातळी पाहता पाणी शटडाऊन म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही |In view of the reduced water level, the possibility of water shutdown i.e. increase in water reduction indirectly cannot be ruled out
Barvi Dam: बारवी धरणात उरला फक्त  31 टक्के पाणीसाठा, बाष्पी भवनामुळे धरणांच्या पातळीत घट
Barvi DamSAKAL

Kalyan news: ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या झळा बसत असून धरणातील पाणी साठ्यात देखील बाष्पीभवनामुळे घट होताना दिसत आहे मागील वर्षाच्या तुलनेत बारवी धरणातील पाणीसाठा हा तीन टक्क्यांनी खाली आला आहे.

तसेच ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी ती 30 ते 35 टक्क्यांच्या आसपास आहे. पाण्याची खालावलेली पातळी पाहता पाणी शटडाऊन म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (thane news)

Barvi Dam: बारवी धरणात उरला फक्त  31 टक्के पाणीसाठा, बाष्पी भवनामुळे धरणांच्या पातळीत घट
Kalyan News: मतदान यादीतून नाव गायब? तर इथे नोंद करा... दक्ष नागरिकांनी उचलले पाऊल

ठाणे जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून उष्णतेचा पारा चढला असून असह्य उष्म्यामुळे जनता हैराण झाली आहे. एप्रिल ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणांतील पाणी साठ्यावर सर्वाधिक होतो. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत जाते. त्याचा परिणाम

ठाणे व उपनगरांतील शहरांना करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो. (barvi dam water storage)

पाच - सहा वर्षांपूर्वी एप्रिल, मे महिन्यात जाणवणारी पाणी टंचाईची झळ कमी झाली आहे. बारावी धरणाची वाढलेली उंची आणि अधे मध्ये पडणारा अवकाळी पाऊस यामुळे पाणी कपात करण्याची वेळ शासनावर येत नाही.

Barvi Dam: बारवी धरणात उरला फक्त  31 टक्के पाणीसाठा, बाष्पी भवनामुळे धरणांच्या पातळीत घट
Kalyan News: शेवटच्या एका तासात चित्र पालटले, कल्याणमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान

15 जूलै पर्यत पुरेल असे पाण्याचे नियोजन करण्यात येते. पाणी कपातीचा कोणताही निर्णय नाही असे शासनाकडून सांगितले जाते. पाणी कपात केली जात नसली तरी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा बंद ठेवणे आणि त्यानंतर पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे अनेक भागांत पाणी टंचाईचा सामना नागरिक करत आहेत.(maharashra news)

जिल्ह्यात मागील महिन्यापासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. मुंंबई, ठाणे आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन, धरणाच्या पातळींमध्ये घट होत आहे. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी ही 30 ते 35 टक्क्यांवर आली आहे.

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असलेले बारावी धरणात सध्याच्या घडीला 31 टक्के पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची पातळी ही 60.52 मीटर असून 106 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात 34 टक्के पाणीसाठा होता. पाण्याची पातळी ही 61.24 मी इतकी तर 115.60 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होता. (marathi Dam News)

Barvi Dam: बारवी धरणात उरला फक्त  31 टक्के पाणीसाठा, बाष्पी भवनामुळे धरणांच्या पातळीत घट
Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात झाले एकूण 50.12 टक्के मतदान; निवडणूक निर्णय अधिकारी सातपुतेंची माहिती

शहापूर तालुक्यातील भातसा धरणा सध्याच्या घडीला 29.52 टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ही 109 मीटर असून 278.1 69 द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा आहे.

तसेच तानसा धरणात 29. 47 टक्के, मोडक सागर मध्ये 18.58 टक्के, मध्य वैतरणा मध्ये 11.10 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा पाऊस पडेपर्यंत पुरेसा असल्याचा दावा जलसंपदा, लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांंकडून करण्यात आला आहे.(latest Marathi News)

जून अखेरपर्यंत मुंबई, ठाणे शहरांना दैनंदिन पुरेसा पाणी पुरवठा होईल एवढा पाणीसाठा ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये आहे. त्यामुळे पाणी कपातीची कोणतीही शक्यता नाही असे लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Barvi Dam: बारवी धरणात उरला फक्त  31 टक्के पाणीसाठा, बाष्पी भवनामुळे धरणांच्या पातळीत घट
Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com