
मुंबई, ता. 28 : धारावीमध्ये आज दिवसभरात केवळ 5 नविन रूग्णांची भर पडली असून धारावीतील एकूण रूग्णसंख्या 2745 इतकी झाली आहे. मात्र धारावीत आता केवळ 93 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान जी उत्तरमील दादर-माहिममध्ये देखील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसते.
दादरमध्ये आज 19 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2489 इतकी झाली आहे.तर 400 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर माहीममध्ये आज 34 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 2192 इतकी झाली. तर 294 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणा-या 'जी' उत्तर विभागात आज 58 नविन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 7,426 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 489 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
'जी' उत्तरमध्ये कोरोनामुक्त होण्याचा आकडाही वाढत असून आतापर्यंत धारावीमध्ये 2,392, दादरमध्ये 1998 तर माहीममध्ये 1818 असे एकूण 6,208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 787 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या महत्त्वाच्या बातम्याही वाचा :
( संकलन - सुमित बागुल )
only five new covid19 patients detected from dharavi area only 93 active patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.