मुंबईकरांनो उद्याच्या पावसाबाबत आली महत्त्वाची माहिती, आधी वाचून घ्या

समीर सुर्वे
Friday, 28 August 2020

मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मंगळवार पर्यंत हलक्‍या सरी कोसळतील.

मुंबई :  मुंबईत आज पुन्हा पावसाने जोर धरला असून उद्याही जोरदार पावसाची शक्‍यता आहे.तर,ठाणे,रत्नागिरी जिल्ह्यातही उद्या जोरदार पावसाची शक्‍यता आहे.पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असून या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जाहीर केला आहे.मुंबईत आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मुंबईत आज सकाळ पासूनच पावसाची रिपरीप सुरु होती.दुपरच्या वेळीच पाऊस जोरदार कोसळू लागला.चेंबूर येथे संध्याकाळी 5 वाजे पर्यंत 24 तासात तब्बल 116.4 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला. तर, सांताक्रुझ येथे 63.8 मि.मी पावसाची नोंद झाली. वांद्रे येथे 62.6, वरळी येथे 57.2 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत दोन दिवसांपासून हलक्‍या सरी होत असल्याने तापामानात सरासरी पेक्षा दिड अंशांची वाढ झाली होती. मात्र, पावसाळी वातावरणामुळे पुन्हा गारवा निर्माण झाला असून 31 अंशा पर्यंत पोहचलेले तापमान पुढील दोन दिवस 28 अंशा पर्यंत खाली येईल असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मोठी बातमी आली लहर, केला कहर! चोराने चोरलं महावितरण कार्यालयातील हजेरीपत्रक, कर्मचाऱ्यांना लागला शॉक

मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर मंगळवार पर्यंत हलक्‍या सरी कोसळतील. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्‍यता असून या जिल्ह्यांमधील काही भागात 204 मि.मी पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्‍यता असली तरी रविवारी पालघर मध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात मंगळवार पर्यंत हलक्‍या सरी कोसळतील असा अंदाज आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

weather department forecast rain in mumbai orange alert issued


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weather department issued orange alert in mumbai read full weather forecast