

Mumbai Illegal Schools
ESakal
मुंबई : मुंबईतील अनधिकृत शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात १६४ अनधिकृत शाळांपैकी केवळ नऊ शाळा बंद झाल्याची बाब समोर आली आहे. उर्वरित शाळांवर कारवाईचे आव्हान कायम असून, अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे अधिकृत शाळांमध्ये समायोजन करण्याचा प्रश्नही अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही.