...तरच लोकल सुरू करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

प्रशांत कांबळे
Sunday, 11 October 2020

सगळ्यांनाच लोकलने जायचे आहे. कारण आता रेस्टॉरंट खुली केली आहेत. कार्यालये सुरू केली आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येत आहे. त्यामुळे लोकलमध्ये गर्दी नको. 
 

मुंबई ः लोकल सेवा सुरू केल्यास प्रवाशांची गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी लोकलची संख्या वाढवण्याची गरज आहे. यासंबंधी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली असून, लोकलची संख्या वाढल्यास लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिले. 

उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा, आरेचे कारशेड कांजूरमार्गला

राज्य सरकारने "मिशन बिगेन अगेन'अंतर्गत हळूहळू अनेक गोष्टी सुरू केल्या आहेत. त्या कराव्याच लागणार आहेत; मात्र नागरिकांनी मास्कचा वापर सर्वाधिक करायला पाहिजे. राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. त्यानंतर आता लोकल सुरू करण्यापूर्वी गर्दी कमी करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळ्यांनाच लोकलने जायचे आहे. कारण आता रेस्टॉरंट खुली केली आहेत. कार्यालये सुरू केली आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढविण्यात येत आहे. त्यामुळे लोकलमध्ये गर्दी नको. 

जिममालकांशीही चर्चा! 
जिममालकांसोबतही बोलतो आहे. त्यांनाही परवानगी द्यावी लागणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

विनामास्क फिरू नका! 
बस, रेल्वे प्रवासामध्ये मास्क कुठेही काढू नये. सार्वजनिक शौचालयांमध्येही मास्कचा वापर करावा. कोरोना विषाणू अधिक वेळापर्यंत जिवंत राहून आरोग्याला हानीकारक ठरू शकतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
(संपादन- बापू सावंत)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... only then will the local start; Hints from Chief Minister Uddhav Thackeray