मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा, आरेचं कारशेड कांजूरमार्गला

पूजा विचारे
Sunday, 11 October 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. आरेतलं मेट्रोचं कारशेड मुख्यमंत्र्यांनी गुंडाळलं आहे. आता मेट्रोचं कारशेड आरे ऐवजी कांजूरमार्गला होणार आहे.

मुंबईः  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. आरेतलं मेट्रोचं कारशेड मुख्यमंत्र्यांनी गुंडाळलं आहे. आता मेट्रोचं कारशेड आरे ऐवजी कांजुरमार्गला होणार आहे. शासकीय जमिनीवर कारशेड होणार असल्यानं खर्च शून्य रुपये असणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सुरुवातीला आरे कॉलनीतील होणाऱ्या मेट्रो कारशेडला ठाकरे सरकारनी स्थगिती दिली त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारने ही जागा मोफत देऊ केली आहे. आतापर्यंत आरे परिसरातील कारशेडसाठी झालेले बांधकाम आणि खर्चही वाया जाऊ देणार नाही. जनतेच्या प्रत्येक पैशाचा विनियोग राज्य सरकार योग्यप्रकारे करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आरे कारशेडला माझा विरोध होता. तशी भूमिकादेखील मांडली होती. त्यामुळं आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

आता मुंबईत 800 एकराचं जंगल असणार आहे. आहे ते टिकवणं आपलं काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नसल्यांचही त्यांनी सांगितलं. 

अधिक वाचाः  राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार असाधारण रजा

तूर्तास लोकल सुरु होणार नाही

मुख्यमंत्र्यांनी तूर्तास लोकल ट्रेन सुरु न करण्याचे संकेत दिलेत. सर्वांनाच लोकल हवी आहे, पण मला गर्दी नको. त्यामुळे सध्या आपण लोकलची संख्या वाढवण्यावर भर देणार आहोत. ही संख्या वाढल्यावर त्यात आणखी लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

आम्हाला जनतेची काळजी आहे. सरकार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर नव्हे तर आमच्यावर आहे. उगाच तंगड्यात तंगडं घालण्याची सवय नाही. आपण सर्व दारे हळुवार उघडतोय. या दारातून सुबत्ता आणि समृद्धी आली पाहिजे. योग्य काळजी न घेतल्यास या दारांतून कोरोना शिरेल. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ, असंही मुख्यमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचाः  राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा

मास्क हवा की लॉकडाऊन हवा, सोशल डिस्टन्सिंग हवं की लॉकडाऊन हवं, कामावर जायचंय की लॉकडाऊन हवा, याचा विचार तुम्हीच करा, असं म्हणत  आपल्याकडेही ज्या गोष्टी सुरु झाल्यात त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

Chief Minister Uddhav Thackeray addressing people Metro car shed Kanjur marg

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray addressing people Metro car shed Kanjur marg