Mumbai News : मुंबईतील उघडी मॅनहोल १९ जूनपूर्वी बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे अधिका-यांना आदेश

पावसाळा काही दिवसात सुरू होईत. मात्र अजूनही काही ठिकाणी उघडे मॅनहोल असल्याचे निदर्शनास येत आहे.
mumbai manholes
mumbai manholessakal

मुंबई - पावसाळा काही दिवसात सुरू होईत. मात्र अजूनही काही ठिकाणी उघडे मॅनहोल असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मुंबईतील उघङी मॅनहोल येत्या १९ जूनपूर्वी बंद करावीत, कोणतेही मॅनहोल उघडे राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

सहा वर्षापूर्वी जोरदार पावसांत डॉ. दीपक अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर पालिकेने मुंबईतील सर्व मॅनहोल सुरक्षित करण्याच्यादृष्टीने पावले उचलली. पावसाळ्यात सुरक्षेच्यादृष्टीने मॅनहोलना सुरक्षित जाळ्या बसवल्या जातात.

नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मॅनहोल संदर्भात केलेल्या आणि करण्यात येणा-या व विविध उपाययोजनांबाबत उच्च न्यायालयानेही पालिकेला निर्देश दिले होते. पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नयेत व दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही मुंबईत काही ठिकाणी मॅनहोल उघडी असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे पालिका आयुक्तांनी लक्ष वेधले असून सर्व मॅनहोलचे सर्वेक्षण करून उघडी मॅनहोल १९ जूनपूर्वी बंद करावीत, पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

दरवर्षी पावसापूर्वी उघड्या किंवा असुरिक्ष मॅनहोल दुरुस्त करून जाळ्या बसवल्या जातात. मुंबईत एक लाखांवर मॅनहोल आहेत. यात पर्जन्य वाहिनी विभागाच्या अखत्यारीत २५ हजार ६०० तर मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत ७४, ६८२ मॅनहोल आहेत.

mumbai manholes
Dombivali Crime : पोलीस अधिकारी शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ७४ हजार मॅनहोल पैकी फ्लडिंग पाईट्स जवळ असलेल्या १९०० मॅनहोलवर तर शहरातील २५ हजार पर्जन्य वाहिनी असलेल्या तीन हजार अशा सुमारे पाच हजार मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, त्यामुळे उर्वरित असुरिक्षत असलेल्या मॅनहोलवर अजूनही सुऱक्षित जाळ्या बसलेल्या नसल्याचे समोर आले आहे. पाऊस सुरु झाला असतानाही अनेक मॅनहोल उघडी असल्याचे समोर आले आहे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर ही मॅनहोल बंद करण्याच्या कामासाठी संबंधित अधिका-यांची धावपळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com