लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईच्या हद्दीत ऑपरेशन 'ऑल ऑऊट'

Loksabha 2024: निवडणुका संपेपर्यंत या प्रकारची कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली |The police informed that this type of action will continue till the end of the elections
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईच्या हद्दीत ऑपरेशन 'ऑल ऑऊट'
crimesakal

Navi Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी ऑपरेशन ऑल ऑऊट आणि कोंबींग ऑपरेशन राबवून रेकॉर्ड वरील आरोपी, पाहिजे व फरार आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अंमली पदार्थ व मद्याची विक्री व सेवन करणारे, बेकायदा हत्यार बाळगणारे गुन्हेगार व बेकायदेशीर कृत्य करणाऱयांची धरपकड सुरु केली आहे.

पोलिसांनी गत 1 ते 3 मे या कालावधीत ऑल ऑऊट व कोंबींग ऑपरेशन राबवून तब्बल 3123 व्यक्तींवर वेगवेगळ्या प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. निवडणुका संपेपर्यंत या प्रकारची कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटकावर व ग्न्हेगारांवर वचक राहून लोकसभेच्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या सुचनेनुसार गत 1 ते 3 मे या कालावधीत संपुर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऑल आऊट व कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले.

या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 57 पाहिजे आरोपी व 1 फरार आरोपीला अटक करण्यात आली. तसेच अंमली पदार्थाची विक्री करणाऱया 15 जणांना अटक करुन त्यांच्याकडुन लाखो रुपये किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा अंमली पदार्थ जफ्त करण्यात आला.

त्याचप्रमाणे अमली पदार्थाचे सेवन करणाऱया 221 जणांवर तसेच दारुची विक्री, सेवन व वाहतुक करणाऱया 309 लोकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकांबदीदरम्यान, पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लघंन करणाऱया 1310 वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.

त्याचप्रमाणे अवैध शस्र बाळगणाऱया 13 जणांना अटक करुन त्यांच्याकडुन तलवार, चाकु, कोयता यासारखरे घातक हत्यारे देखील जफ्त केली आहेत. या कारवाईत 173 आरोपींना बेलेबल व नॉन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले. त्याचप्रमाणे 977 संबंधितांना समन्सची बजावनी करण्यात आली.

त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱया 886 व्यक्तींविरोधात कोफ्टातंर्गत कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाने अभिलेखावरील 148 हिस्ट्रीशिटर आरोपींची तसेच 178 रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली.

त्यापैकी 13 जणांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे कलम 283, 285 नुसार 219 कारवाया तसेच इतर 22 अवैध धंद्यावर त्याचप्रमाणे नियमभंग करणाऱया 12 बारवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच 118 एमपी ऍक्ट 110/117 नुसार देखील कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या निर्देशानुसार परिमंडळ-1 चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, परिमंडळ-2 चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या ऑल ऑऊट ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी ,यांच्यासह इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com