मालामाल होण्याची सुवर्णसंधी, फक्त मगरीच्या गळ्यातला टायर काढा..

मालामाल होण्याची सुवर्णसंधी, फक्त मगरीच्या गळ्यातला टायर काढा..

मुंबई - आपण दररोज अनेक व्हायरल गोष्टी पाहत असतो, whatsapp  किंवा फेसबुकच्या माध्यमातून त्या आपल्या सर्वांसमोर येत असतात. अशात अशी आणखीन एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पाहून तुम्हाला वाईट नक्कीच वाटेल पण जर तुम्ही हे कोडं सोडवलं तर मात्र तुम्ही मालामाल देखील होऊ शकतात. पण बातमी तशी गंभीर आहे आणि आपणच करत असलेल्या प्रदूषणाशी संबंधित. 

इंडोनेशियात अशी एक मगर आढळली आहे जिच्याभोवती गेली अनेक वर्ष एक टायर अडकलाय. हा टायर आहे एका बाईकचा. या मगरीला या टायरची आता सवय झालीये,  मात्र या टायरमुळे या मगरीचे कार्यक्षमता कमी झालीये. तिला नीट खातापिता येत नाही आणि तिला तिचं आयुष्य नीट जगताही येत नाहीये. या टायमरमुळे कदाचित या मगरीचा जीव देखील जाऊ शकतो.   

कदाचित तुम्ही या मगरीचे फोटो या आधीच पहिले असतील. या मगरीच्या गळ्यात एका बाईकचा टायर अडकला आहे. साधारण २०१६ म्हणजे चार वर्ष आधी, ही मगर पालू नदीत लोकांच्या नजरेस पडली होती.तेंव्हापासून हा टायर या मगरीभोवतीच आहे.  या महाकाय मगरीचे लांबी तब्ब्ल १३ फूट म्हणजे साधारण चार मीटर आहे. या आधी देखील इथल्या नागरिकांनी या मगरीच्या गळ्यातून हे टायर काढण्याचा प्रयत्न केलाय असं बोललं जातंय. मात्र ते काही फारशे यशस्वी झालेले नाहीत. 

आता या मगरीला या 'टायर मिठी'तुन दूर करण्यासाठी इथल्या सरकारने, जो कोणी मगरीच्या गळ्यातून टायर काढेल त्याला बक्षीस जाहीर केलंय. नक्की किती बक्षीस देणार याबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. साधारण चार वर्षांपासून या मगरीच्या गळ्यात हा टायर अडकलाय.

दरम्यान हा टायर काढण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आलेत. मात्र ते यशस्वी झालेले नाही. अशात एखाद्या एक्स्पर्टने याची दखल घेऊन या मगरीला जीवदान देण्याचं आवाहन आता करण्यात आलंय. या मगरीबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातायत. या मगरीला पाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र पुढे मगर मोठी झाल्यावर तिचा सांभाळ करणं कठीण झाल्याने तिच्या गळ्यात टायर अडकवून सोडून देण्यात आलं, असं बोललं जातंय. २०१८ मध्ये इंडोनेशियामध्ये त्सुनामी आलेली. या त्सुनामीतुन ही मगर वाचली. 

त्यामुळे तुमच्याकडे जर अनुभव असेल, तर नक्की ट्राय करा. कदाचित तुमच्या प्रयत्नांमुळे ही मगर वाचेल आणि तिला जीवदान मिळेल.      

opportunity to earn money just remove Tyre from the neck of crocodile

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com